मराठी मुळाक्षरे(Marathi Mulakshare)

वर्णमाला(Marathi Alphabets) :- वर्णमाला म्हणजे वर्णांचा संच आणि वर्ण म्हणजे आपण जे तोंडाद्वारे मूलध्वनी बाहेर पडणाऱ्या ध्वनीला असे वर्ण म्हणतात.

मराठी (Marathi Varnamala)भाषेच्या वर्णमालेत एकूण  १२  स्वर, ३४ व्यंजन आणि २ स्वरादी असे एकूण ४८ वर्ण दिले आहेत. तसेच 'क्ष' आणि  'ज्ञ'  ही जोडअक्षरे आहेत.  

  स्वर (Marathi Swar) 

  Marathi Mulakshare
  Marathi Mulakshare


  स्वर(Swar Marathi) :- ओठाचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतो त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांना स्वतंत्र उच्चार असतो.   

   अ

   आ 

   इ

    ई

   उ

   ऊ

   ऋ

   ए 

   ऐ

   ओ

   औ

   अं

   अ:

   


  स्वरांचे  प्रकार 

  स्वरांचे ३ प्रकार पडतात 

  1. र्‍हस्व स्वर
  2. दीर्घ स्वर
  3. संयुक्त स्वर
  १. र्‍हस्व स्वर :-
   ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे ज्यांचा उच्चार करायला थोडाच वेळ लागतो त्यांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
  उदा :- अ, इ, उ, ऋ

  २. दीर्घ स्वर :- 
  ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो म्हणजेच त्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
  उदा :- आ, ई, ऊ 

  ३. संयुक्त स्वर :-
  दोन स्वर एकत्र येऊन जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
  उदा :-
  ए = अ + इ/ई
  ऐ – आ+इ/ई
  ओ – अ+उ/ऊ
  औ – आ+उ/ऊ

  सजातीय स्वर :-
  एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
  उदा :- अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ

  विजातीय स्वर :-
  भिन्न उच्चारस्थानांतून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
  उदा :- अ-ई, उ-ए, ओ-ऋ

  मराठी व्यंजन(Marathi Vyanjan) 

  Marathi Alphabets
  Marathi Alphabets


  ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही तसेच या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी ‘अ’ या स्वराचे साहाय्य घ्यावे लागते, अशा वर्णांना व्यंजने (vyanjan in marathi) असे म्हणतात.

  ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वरांची मदत घेतली जाते त्यांना व्यंजन/स्वरान्त/परवर्ण असे म्हणतात. मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत. तसेच 'क्ष' आणि  'ज्ञ'  ही जोडअक्षरे आहेत. 

  Marathi Vyanjan Worksheets पुढील प्रमाणे आहे.

   क 

   ख

   ग

   घ

   ड

   च

   छ

   ज

   झ

   त्र

   ट

   ठ

   ड

   ढ

   ण

   त

   थ

   द

   ध

   न

   प

   फ

   ब

   भ

   म

   य

   र

   ल

   व

   श

   ष

   स

   ह

   ळ

   क्ष

   ज्ञ

   


  व्यंजनाचे प्रकार 


  स्पर्श व्यंजन:-
  वर्णमालेतील क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनोच्चारात आपल्या फुप्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात किंवा ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
   उदा:- क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

  कठोर व्यंजन:-
  प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने यांचा उच्चार करताना अधिक स्पर्श होतो म्हणून त्यांना कठोर व्यंजने म्हणतात.
  उदा :- क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ

  मृदू व्यंजन :-
  प्रत्येक वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन यांचा उपचार करताना थोडासाच स्पर्श होतो. तसेच जे उच्चारायला कोमल किंवा मृदु त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात .
  उदा :-  ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

  अनुनासिक :-
  प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन यांचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात.
  उदा :-  ड, त्र, ण, न, म

  अर्धस्वर/अंतस्थ :-
  य, र, ल, व, या व्यंजनांचा उच्चार जवळपास स्वरांसारखाच होतो त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. तसेच ही व्यंजने स्पर्श व्यंजने व ऊष्मे यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्थ  म्हणतात.

  उष्मे /घर्षक :-
  श, ष, स यांना उष्मे म्हणतात. या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते त्यांना  उष्मे म्हणतात.

  महाप्राण आणि अल्पप्राण
  ह, ख  या वर्णाचा उच्चार करताना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर जोराने फेकली जाते, म्हणून याला महाप्राण असे म्हणतात व इतर वीस व्यंजनांना अल्पप्राण म्हणतात.

  Post a Comment

  थोडे नवीन जरा जुने